Description
धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती आणि धनोजे कुणबी समाज मंदिर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपवर-वधू परिचय मेळावा आणि कृषी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम २७, २८ व २९ डिसेंबर या कालावधीत चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर होणार आहे.
कार्यक्रमाची वेळापत्रक
शुक्रवार, २७ डिसेंबर २०२४
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत
उद्घाटन सोहळा
सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
उपवर-वधू परिचय मेळावा
दुपारी ३ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
उद्योजकता मार्गदर्शन
संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत
सांस्कृतिक कार्यक्रम
शनिवार, २८ डिसेंबर २०२४
सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
उपवर-वधू परिचय मेळावा
दुपारी ३ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
शेती तज्ञांचे मार्गदर्शन
संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत
सांस्कृतिक कार्यक्रम
रविवार, २९ डिसेंबर २०२४
सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत
अमृत महोत्सवी सभासदांचा सत्कार सोहळा
दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत
सरपंच परिषद
दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
प्रबोधन कार्यक्रम
संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत
सांस्कृतिक कार्यक्रम
विशेष आकर्षण
कार्यक्रमाच्या तीनही दिवसांत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर आयोजित केले जाईल. याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा.
अर्ज करण्याची माहिती
उपवर व वधूंच्या परिचयासाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरताना खालील सूचना पाळाव्यात:
ऑनलाईन अर्ज: उमेदवार http://www.dkchanda.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
ऑफलाईन अर्ज: धनोजे कुणबी समाज मंदिर, चंद्रपूर मधे अर्ज उपलब्ध आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ५ डिसेंबर २०२४
अर्ज शुल्क: ५०० रुपये
कार्यक्रम स्थळ: चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर
कार्यक्रमाचे उद्दीष्ट
धनोजे कुणबी समाजासाठी हा कार्यक्रम उपवर व वधूंना एकमेकांचा परिचय करून देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. याशिवाय, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयक मार्गदर्शन आणि उद्योजकतेच्या संधींवर भर दिला जाईल. आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधन सत्र यामुळे हा कार्यक्रम सर्वसमावेशक होणार आहे.
संपर्क साधा
अधिक माहितीसाठी धनोजे कुणबी समाज मंदिर, चंद्रपूरशी संपर्क साधा. हा कार्यक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.
प्रा . नामदेव मोरे : +91 9850597485
श्री . विलास माथनकर : +91 9850315250
ऑफिस : +91 9922581409
Email To : admin@dkchanda.in,
Email To : editor@dkchanda.in
Location
-
Nagpur Road Pani Tanki DNR Office Nagpur Road Pani Tanki DNR Office, Civil Lines, Chandrapur, Maharashtra 442402, India
Add a review